
लाडकी बहीण eKYC साठी नवीन पर्याय: चुका सुधारण्याची सुवर्णसंधी, पुन्हा eKYC करा!
‘लाडकी बहीण eKYC’ प्रक्रियेत अनेक महिलांकडून झालेल्या चुकांमुळे लाभ मिळण्यात अडथळे येत होते. मात्र आता अविवाहित, विधवा, घटस्फोटित तसेच पती/वडील हयात नसलेल्या सर्व महिलांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. सरकारने लाडकी बहीण eKYC दुरुस्ती करण्यासाठी एकदाच सुधारणा करण्याचा नवीन पर्याय उपलब्ध करून दिला आहे.
ही सुधारणा ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत करता येणार आहे.
eKYC दुरुस्तीचा नवीन पर्याय उपलब्ध
लाडकी बहीण योजनेतील पात्र महिलांनी आधी केलेल्या eKYC मध्ये जर कोणतीही चूक झाली असेल, तर आता ती दुरुस्त करता येणार आहे. हा पर्याय विशेषतः खालील महिलांसाठी महत्त्वाचा आहे —
- अविवाहित महिला
- विधवा महिला
- घटस्फोटित महिला
- पती हयात नसलेल्या महिला
- वडील हयात नसलेल्या मुली
सुधारणा करण्याची संधी फक्त एकदाच उपलब्ध आहे, म्हणून माहिती अचूकपणे भरने अत्यंत आवश्यक आहे.
लाडकी बहीण eKYC दुरुस्ती करण्याची ऑनलाईन प्रक्रिया
लाडकी बहीण eKYC दुरुस्त करण्यासाठी लाभार्थ्यांनी खालील प्रक्रिया करावी:
1) अधिकृत वेबसाइटला भेट द्या
https://ladkibahin.maharashtra.gov.in येथे लॉगिन करा.
येथे दिसणाऱ्या ‘येथे क्लिक करा’ या पर्यायावर क्लिक करा.
2) आधार क्रमांक व कॅप्चा भरा
- लाभार्थी महिलेचा आधार क्रमांक
- कॅप्चा कोड
- ‘मी सहमत आहे’ वर टिक
- ‘ओटीपी पाठवा’ वर क्लिक
मोबाइलवर आलेला OTP टाकून पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
3) वैवाहिक स्थिती निवडा
- विवाहित
- अविवाहित
यापैकी योग्य पर्याय निवडल्यावर पुढील माहिती विचारली जाईल.
भोगवटादार वर्ग -2 जमिनीची खरेदी-विक्री कशी करायची? नियम काय सांगतो?
विवाहित महिलांसाठी लाडकी बहीण eKYC प्रक्रिया
१) पती हयात असल्यास
- पतीचा आधार क्रमांक भरा
- पतीच्या मोबाइलवर आलेल्या OTP ने पडताळणी पूर्ण करा
२) पतीचे निधन / घटस्फोट असेल तर
- मृत्यू दाखला / घटस्फोट कागदपत्रे
- ही कागदपत्रे ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अंगणवाडी सेविकेकडे जमा करण्यास संमती द्यावी
अविवाहित महिलांसाठी लाडकी बहीण eKYC
१) वडील हयात असल्यास
- वडिलांचा आधार क्रमांक भरावा
- वडिलांच्या मोबाइलवर आलेल्या OTP द्वारे पडताळणी
२) वडिलांचे निधन झाले असल्यास
- वडिलांच्या मृत्यू दाखल्याची सत्यप्रत
- ती अंगणवाडी सेविकेकडे जमा करण्यास संमती द्यावी
अंतिम प्रक्रिया – जात, उत्पन्न व घोषणापत्र
सर्व परिस्थितीत लाभार्थींनी:
- योग्य जात प्रवर्ग निवडावा
- कुटुंबातील कोणताही सदस्य कायम सरकारी सेवेत नाही किंवा करदाता नाही याची खात्री करून ‘नाही’ हा पर्याय निवडावा
- अंतिम घोषणापत्रावर टिक करून eKYC सबमिट करावी
सबमिशननंतर, “आपली लाडकी बहीण eKYC यशस्वी झाली” असा संदेश स्क्रीनवर दिसेल.
- मृत्यूपत्रा मध्ये एकाच मुलाला संपूर्ण संपत्ती दिल्यास WILL रद्द होऊ शकते का?
- मृत्यूपत्र (Will) रजिस्टर करणे आवश्यक आहे का? | कायदा, फायदे-तोटे व संपूर्ण मार्गदर्शन
- महार वतनाच्या जमिनीवर शासनाचे नाव असले तरी परत घेता येते का? | सविस्तर कायदेशीर माहिती
- Succession Certificate म्हणजे काय? | वारसा हक्क प्रमाणपत्र संपूर्ण माहिती
- वारस नोंद म्हणजे काय? | वारस नोंदीसाठी आवश्यक कागदपत्रे – संपूर्ण माहिती
-
मृत्यूपत्रा मध्ये एकाच मुलाला संपूर्ण संपत्ती दिल्यास WILL रद्द होऊ शकते का?
मृत्यूपत्रा मध्ये एकाच मुलाला संपूर्ण संपत्ती दिल्यास WILL रद्द होऊ शकते का? (Will Can Be Cancelled If Property Given to […]
-
मृत्यूपत्र (Will) रजिस्टर करणे आवश्यक आहे का? | कायदा, फायदे-तोटे व संपूर्ण मार्गदर्शन
मृत्यूपत्र (Will) रजिस्टर करणे आवश्यक आहे का? | कायदा, फायदे-तोटे व संपूर्ण मार्गदर्शन मालमत्तेच्या नियोजनात (Property Planning) मृत्यूपत्र (Will) हा […]
-
महार वतनाच्या जमिनीवर शासनाचे नाव असले तरी परत घेता येते का? | सविस्तर कायदेशीर माहिती
महार वतनाच्या जमिनीवर शासनाचे नाव असले तरी परत घेता येते का? | सविस्तर कायदेशीर माहिती महाराष्ट्रात आजही हजारो कुटुंबांच्या जमिनी […]