सामूहिक खरेदी शेतजमीनीची वाटणी: संपूर्ण माहिती (A to Z)
Land Information:- आज आपण पाहणार आहोत की सामूहिक खरेदी शेतजमिनीची वाटणी महाराष्ट्रमध्ये खूप लोकांना शहर सोडून लांब गावात शांततेसाठी जमीन घ्यायची असते पण 4 व 5 किंवा त्या पेक्षा कमी जमीन तुकडे बंदी कायद्यामुळे घेता येत नाही म्हणून शहरातील लोक चार पाच जण एकत्र येऊन सामायिक जमिनी खरेदी करतात व त्यामुळे जरी खरीदी खतात प्रत्येकाच्या वेगवेगळे क्षेत्र असले तरी ते सातबारा उताऱ्यावर सामूहिक रित्या लागते तर आज आपण पाहणार आहोत की त्या शेत जमिनीची वाटणी कशी करावी तसेच या जमिनीची वाटणी करताना कायदेशीर नियम, प्रक्रिया आणि मुद्दे लक्षात घेणे आवश्यक असते. या ब्लॉगमध्ये आम्ही सामूहिक शेतजमिनीची वाटणी कशी करावी, त्यासाठीचे नियम, कागदपत्रे आणि टिप्स याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.
1. सामूहिक खरेदी शेतजमीन म्हणजे काय?
सामूहिक खरेदी शेतजमीन म्हणजे अशी जमीन की ती जमीन चार-पाच लोकांनी एकत्र येऊन खरेदी केलेली असते त्यामुळे सर्वांची नावे सामूहिक रित्या सातबारा उताऱ्यावर लागतात म्हणजे सामूहिक खरेदी शेत जमीन होय .
2) सामूहिक खरेदी शेतजमीन सामाईक असते का सर्वांचे शेत्र वेगवेगळे असते
तर नाही कारण लोकांना चार-पाच गुंठे जमीन घ्यायची असते पण ती घेता येत नाही म्हणून चार-पाच लोक एकत्र येऊन वेगवेगळे क्षेत्र घेऊन एकच खरेदीखत करतात दहा ते वीस गुंठे जमीन घेतात पण सर्वांचेक्षेत्रसमान असते का तर नसते पण खरेदी खतानुसार प्रत्येकाची क्षेत्र जरी वेगवेगळे असले तरी ते सामायिक रित्या सातबारावर नोंद होते म्हणून सामाईक रित्या नावे लागतात पण क्षेत्र वेगवेगळे असते.
त्यासाठी रजिस्टर वाटप पत्र करावे लागते.
3. सामूहिक खरेदी शेतजमिनीची वाटणी कशी करावी?
तर सामूहिक खरेदी शेत जमिनीची वाटणी ही दोन प्रकारे होते ती खालील प्रमाणे
(अ) सहमतीने वाटणी (Mutual Partition)
यात सर्व सामायिक खातेदार एकत्र येऊन आपले वेगवेगळे क्षेत्र ठरवून रजिस्टर वाटणी पत्र करतात व त्याप्रमाणे सातबारा उताऱ्यावर नोंद करतात त्या नंतर तुमचे वेगवेगळे खाते तयार होते व प्रत्येकाचे क्षेत्र वेगवेगळे होते व सामायिक खातेदार हे वैयक्तिक खातेदार होतात.
(आ) कायदेशीर वाटणी (Legal Partition)
जर सामायिक खरेदीतील सदस्यांमध्ये मतभेद असतील, तर कोर्टकडे वाटणीचा दावा (Partition Suit) करावा लागतो. व त्यानंतर आपल्या हिश्याचे वेगवेगळे क्षेत्र करून मिळते .
4. आवश्यक कागदपत्रे
सहमतीने वाटणी (Mutual Partition)
✅ 7/12 उतारा
✅ सर्व खातेदारांचे आधार कार्ड पॅन कार्ड
✅ खरेदी खताचा फेरफार किंवा वारस नोंदीचा
✅ फोटो (सर्व वाटेकऱ्यांची)
कायदेशीर वाटणी (Legal Partition)
✅ 7/12 उतारा
✅ सर्व खातेदारांचे आधार कार्ड पॅन कार्ड (असल्यास)
✅ खरेदी खताचा फेरफार किंवा वारस नोंदीचा
✅ फोटो (सर्व वाटेकऱ्यांची)
व इतर कोर्टात मागितल्या प्रमाणे कागदपत्रे
5) सामूहिक खरेदी शेतजमिनी मध्ये कोठेही घर बांधू शकता का?
नाही कारण जरी तुम्ही शेत जमीन घर बांधण्यासाठी घेतलेली असली तरी ती तुम्ही सामूहिकरित्या घेतलेली आहे जरी खरेदी खतात क्षेत्र वेगवेगळे नमूद असले तरी तुम्ही शेत जमीन मोजून वेगवेगळे म्हणजे वैयक्तिक रित्या वेगवेगळे क्षेत्र केलेले नाही व त्यामुळे तुमचे क्षेत्र कुठे आहे हे समजत नाही त्यामुळे तुम्ही सामूहिक खरेदी शेत जमिनीमध्ये रजिस्टर वाटणी पत्र करून वेग वेगळे क्षेत्र मोजल्यावर झाल्यावरच घर बांधा त्यामुळे समजेल की तुमचे क्षेत्र कोठे आहे कारण तुम्ही जर सामोहिक खरेदी शेतजमिनी मध्ये घर बांधले व तुमची जागा वेगळीकडे निघाली तर तुम्हाला भविष्यात घर काढावे लागू शकते.
लेखक: lawinmarathi.in टीम
Jul 27/2025
वरील हा कोणताही कायदेशीर सल्ला नाही फक्त माहिती साठी वरील माहिती दिली आहे
अधिक माहिती साठी संपर्क
Adv Atul L Devkar Mumbai Lawyer
B.com LLB.Gdc and A
Civil / criminal specialist
Mob :- 9920513093 (. सल्ला फी लागू)
FAQ
सामूहिक खरेदी शेतजमीनीची वाटणी: वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
सामूहिकरित्या खरेदी केलेल्या शेतजमिनीची वाटणी करताना अनेक प्रश्न उद्भवतात. येथे आम्ही सर्व महत्त्वाच्या FAQ (वारंवार विचारले जाणारे प्रश्न) देऊन तुम्हाला स्पष्टीकरण देत आहोत.
1. सामूहिक खरेदी शेतजमीन म्हणजे काय?
➡ उत्तर: जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्ती एकत्र पैसे देऊन शेतजमीन खरेदी करतात, तेव्हा ती जमीन “सामूहिक खरेदी शेतजमीन” म्हणून ओळखली जाते. या जमिनीवर सर्व खरेदीदारांचे समान क्षेत्र असतात पण वाटणी केल्यावर वेगवेगळे क्षेत्र होते.
2. सामूहिक खरेदी जमिनीची वाटणी कशी करावी?
➡ उत्तर:
-सहमतीने वाटणी: सर्व भागीदार एकमत झाल्यास, त्यांनी स्वतःच्या वाट्याचा भाग निश्चित करून रजिस्टर वाटणी पत्र (Mutation) करावा.
– कायदेशीर वाटणी: जर मतभेद असतील, तर सिव्हिल कोर्टमध्ये “Partition Suit”दाखल करावे.
– रजिस्टर्ड करार: वाटणी करार (Partition Deed) लेखी करून तो रजिस्टर्ड करावा.
3. सामूहिक जमिनीची वाटणी करताना कोणते कागदपत्रे लागतात?
➡ **उत्तर:**
✅ मूळ खरेदी दस्तऐवज (Sale Deed)
✅ 7/12 उतारा आणि 8-A
✅ सर्व भागीदारांचे आधार कार्ड, पॅन कार्ड
✅ फोटो (प्रत्येकाची)
4. जर एकाच व्यक्तीने जास्त पैसे दिले असतील, तर वाटणी कशी होईल?
➡ उत्तर:
– जर कोणी एका भागीदाराने जास्त गुंतवणूक केली असेल, तर त्याचा वाटा त्यानुसार वाढवता येतो.
– हे खरेदी खतात (Agreement) त्याचे क्षेत्र स्पष्ट नमूद केले पाहिजे.
– सर्वांचे क्षेत्र वेगवेगले खरेदी खतात नमूद केलेले असावे नाहीतर, सर्वांना समान हक्क मिळतात.
5. सामूहिक जमिनीची वाटणी कोर्टशिवाय शक्य आहे का?
➡ उत्तर:
✅ होय, जर सर्व भागीदार सहमत असतील, तर कोर्टशिवाय रजिस्टर वाटणी पत्र करून वाटणी करता येते.
❌ *नाही, जर वाद निर्माण झाला, तर कोर्टमध्ये Partition Case दाखल करावा लागेल.
6. वाटणी केल्यानंतर नवीन 7/12 उतारा कसा मिळेल?
➡ उत्तर:
1. तलाठी कार्यालयात रजिस्टर वाटप पत्र जमा करा.
2. जमीन महसूल विभागाकडून नवीन मोजमाप करून घ्या.
3. 30-60 दिवसांत नवीन 7/12 उतारा अपडेट होईल.
7. सामूहिक जमीन विकण्यासाठी सर्वांनी संमती द्यावी लागते का?
➡ उत्तर:
✅ होय, सामूहिक जमीन विकण्यासाठी सर्व भागीदारांची संमती आवश्यक आहे.
❌ नाही, जर एका व्यक्तीने आपला हिस्सा स्वतंत्रपणे विकायचा असेल, तर ते शक्य आहे (पण त्यासाठी जमीन विभागली गेली पाहिजे).
8. वाटणी केल्यानंतर जमीन कर (Land Tax) कसा भरावा?
➡ उत्तर:
– प्रत्येक वाटेकरी आपल्या जमिनीच्या भागाचा स्वतंत्र करभरू शकतो.
– नवीन 7/12 मध्ये प्रत्येकाचे नाव वेगळे असल्यास, ते स्वतंत्रपणे ऑनलाइन किंवा तलाठी कार्यालयात कर भरू शकतात.
9. जमिनीच्या वाटणीत वाद झाल्यास काय करावे?
➡ उत्तर:
1. प्रथम ग्रामपंचायत किंवा स्थानिक नेत्यांचे मध्यस्थीत समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा.
2. जर ते शक्य नसेल, तर सिव्हिल कोर्टमध्ये Partition Case दाखल करा.
3. वकिलाचा सल्ला घेऊन कायदेशीर कारवाई करा.
10. सामूहिक जमिनीवर बांधकाम करण्यासाठी काय करावे?
➡ उत्तर:
– जर जमीन वाटली गेली असेल, तर प्रत्येक आपल्या भागावर बांधकाम करू शकतो.
– जर जमीन अजून वाटली नसेल, तर सर्वांची संमती घेऊनच बांधकाम करावे.
– ग्रामपंचायत किंवा नगरपालिकेकडून बिल्डिंग परमिट घ्यावे.
निष्कर्ष
सामूहिक खरेदी शेतजमिनीची वाटणी करताना कायदेशीर प्रक्रिया, कागदपत्रे आणि सहभागीांची संमती महत्त्वाची असते. जर वाद निर्माण झाला, तर लवकरात लवकर वकिलाचा सल्ला घ्यावा. योग्य पद्धतीने वाटणी केल्यास भविष्यातील वाद टाळता येतात.
📌 लक्षात ठेवा: जमीन ही फक्त संपत्ती नसून, भावनिक आणि आर्थिक महत्त्वाची असते. म्हणून तिची वाटणी जबाबदारीने करावी!
हा ब्लॉग उपयुक्त वाटल्यास, तो इतरांसोबत शेअर करा! 🌾📄