फक्त एका क्लिकमध्ये जाणून घ्या  तुमच्या कुटुंबातील किती सदस्यांना रेशन मिळते!

आता एका क्लिकमध्ये पाहा — तुमच्या रेशन कार्डवर किती लोकांचे नाव आहे ते मोबाईलवर!

आता एका क्लिकमध्ये पाहा — तुमच्या रेशन कार्डवर किती लोकांचे नाव आहे ते मोबाईलवर!

आजच्या डिजिटल युगात सरकारने अनेक सुविधा ऑनलाइन केल्या आहेत. आता तुमचं रेशन कार्ड (Ration Card) सुद्धा तुम्ही मोबाईलवरून सहज तपासू शकता. तुम्हाला रेशन मिळतं का, तुमच्या कार्डवर किती लोकांची नोंद आहे, आणि कोणत्या दुकानातून रेशन मिळतं — हे सर्व तपशील काही सेकंदात पाहता येतात. तसेच तुम्हाला किती लोकांचे रेशनिंग मिळते व गहू किती किलो मिळतात तांदूळ किती मिळतात हे सर्व आज आपण आपल्या ब्लॉग मध्ये पाहणार आहोत चला तर मग पाहू.

रेशन कार्ड म्हणजे काय?

रेशन कार्ड हे एक सरकारी ओळखपत्र आहे ज्याच्या मदतीने नागरिकांना शासनाकडून धान्य, साखर, केरोसिन, तांदूळ गहू इत्यादी वस्तू कमी दरात मिळतात मोफत मिळतात. हे कार्ड प्रत्येक कुटुंबासाठी वेगळं असतं आणि त्यावर सर्व सदस्यांची नोंद असते. चला तर पाहू मग मोबाईल वरून रेशनिंग कार्ड मध्ये किती लोकांचे धान्य मिळत आहे कसे पाहिचे ते.

मोबाईलवरून रेशन कार्ड मध्ये किती लोकांचे धान्य मिळते तपासण्याची सोपी पद्धत:

  1. सर्वप्रथम तुमच्या राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या वेबसाईटला भेट द्यायची आहे त्याची लिंक खाली दिली आहे लिंक वर क्लिक करा या पर्यायावर क्लिक करा

लिंक वर क्लिक करा

  1. वरील लिंक वर तुम्ही क्लिक केल्यावर mahfood या वेबसाईटवर पोहोचताल तिथे तुम्हाला खालील इमेज मध्ये जशी दिले आहे तसे चित्र दिसेल month,Year,Rc No असे दिसेल
  2. त्यानंतर तुम्हाला तुमच्या रेशनिंग कार्डचा बारा अंकी नंबर Ration Card Number Rc Number टाकायचा आहे व सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे.
  3. “Search” वर क्लिक करायाचे आहे
  4. आता स्क्रीनवर तुमच्या रेशन कार्डवरील सर्व सदस्यांची माहिती दिसेल. तसेच तुम्हाला किती लोकांचे रेशनिंग मिळत आहे. किती लोकांची नावे ऑनलाईन आहेत किती किलो गहू मिळत आहेत व किती किलो तांदूळ मिळत आहेत याची सर्व माहिती तुम्हाला तिथे मिळेल तसेच तुम्ही किती तारखेला तुमचा थम दिला आहे हेही समजेल.

रेशन दुकानदाराची माहिती सुद्धा उपलब्ध

या पोर्टलवरून तुम्ही कोणत्या दुकानातून रेशन मिळतं, दुकानदाराचं नाव, संपर्क क्रमांक, आणि शेवटचं वितरण कधी झालं हेही तपासू शकता.

रेशनिंग कार्ड मध्ये एका व्यक्तीला किती धान्य मिळते ते पहा

प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना / PHH (Priority Household): म्हणजे केशरी कार्ड

प्रत्येक सदस्यास ५ किलो धान्य मिळते.

गहू दर: ₹२ प्रति किलो ( म्हणजे दोन किलो गहू मिळतो)

तांदूळ दर: ₹३ प्रति किलो(म्हणजे तीन किलो तांदूळ मिळतो)

महत्वाची सूचना:

जर तुमच्या रेशन कार्डवर चुकीची नोंद असेल किंवा एखाद्या सदस्याचं नाव राहिलं असेल तर तुम्ही ती दुरुस्ती ऑनलाइन अर्जाद्वारे करू शकता. त्यामुळे रेशन कार्ड नियमित अपडेट ठेवणं आवश्यक आहे. तसेच बदल करायचे असल्यास जवळच्या माही सेवा केंद्र किंवा तहसीलदार ऑफिसला जाऊन बदल करू शकतात.

रेशनिंग कार्डसंबंधी अटी व शर्ती:

  1. एकाच कुटुंबाला एकच रेशन कार्ड मिळू शकते. रेशन कार्ड इतरांना हस्तांतरित करता येत नाही.
  2. पत्ता बदलल्यास त्वरित कळवणे आवश्यक. जर तुम्ही राहण्याचा पत्ता बदलत असाल, तर लगेच पुरवठा निरीक्षक किंवा पुरवठा कार्यालयाला माहिती द्यावी.
  3. HoF (Head of Family) म्हणजे कुटुंब प्रमुख. सामान्यतः १८ वर्षांवरील वयाची सर्वात मोठी स्त्री ही कुटुंब प्रमुख मानली जाते. जर स्त्री नसेल तर सर्वात मोठा पुरुष कुटुंब प्रमुख ठरतो.
  4. रेशन कार्ड इतर सरकारी ओळखपत्र म्हणून वापरता येत नाही. म्हणजेच हे Proof of Address किंवा Identity म्हणून वापरता येणार नाही.
  5. शारीरिक अपंग व्यक्तींना (Physically disabled) सवलतीचे हक्क लागू होतात.
  6. डेटा बदल किंवा दुरुस्ती: तुमच्या रेशन कार्डवरील माहितीमध्ये बदल असल्यास संबंधित विभागाशी संपर्क साधावा.

निष्कर्ष:

आता सरकारी सेवा तुमच्या मोबाईलवर आली आहे. फक्त एका क्लिकमध्ये तुम्ही तुमचं Ration Card (रेशन कार्ड) तपासू शकता आणि संपूर्ण माहिती मिळवू शकता. हा लेख आवडला असल्यास आपल्या मित्रांना शेअर करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top