
मुंबई कस्टम विभाग भरती 2025
- 10वी पास उमेदवारांसाठी मोठी संधी
- एकूण जागा : 22
- वेतन : ₹18,000 ते ₹56,900
पदाचे तपशील
पदाचे नाव : Canteen Attendant (कॅन्टीन अटेंडंट)
एकूण जागा : 22 (UR – 8, OBC – 7, SC – 3, ST – 2, EWS – 2)
वेतनश्रेणी : Level-1 in Pay Matrix (₹18,000 – ₹56,900)
शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा
उमेदवारांनी मॅट्रिक्युलेशन (10वी) किंवा समकक्ष प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. वय : 18 ते 25 वर्षे. (आरक्षण व सरकारी सेवकांसाठी सूट लागू.)
आवश्यक कागदपत्रे
- मॅट्रिक्युलेशन प्रमाणपत्र व मार्कशीट (स्व-प्रमाणित छायाप्रति)
- जात प्रमाणपत्र (ज्या वर्गासाठी अर्ज करीत आहात त्या वर्गाचे प्रमाणपत्र)
- ओळखपत्र (आधार / पॅन / ड्रायव्हिंग लायसन्स इ.)
- सरकारी सेवक असल्यास NOC (मूळ प्रत पाठवू नये; फक्तDOCUMENT VERIFICATION वेळी सादर करा)
निवड प्रक्रिया
निवड लेखी परीक्षेच्या (MCQ) माध्यमातून केली जाईल. परीक्षेचे भाग :
- Numerical Aptitude — 15 मार्क
- General English — 15 मार्क
- General Awareness — 15 मार्क
- Canteen Specific Subject (स्वच्छता, अन्न सुरक्षा, पोषण) — 5 मार्क
अर्ज कसा करावा (How to Apply)
अर्ज पत्रे पोस्टद्वारे खालील पत्त्यावर किंवा जाहिरातीमध्ये निर्दिष्ट केलेल्या पद्धतीने पोहोचवावीत. अर्जाच्या लिफाफ्यावर स्पष्टपणे लिहावे — “APPLICATION FOR THE POST OF CANTEEN ATTENDANT”
| पत्ता |
The Assistant Commissioner of Customs (Personnel & Establishment Section), 2nd Floor, New Custom House, Ballard Estate, Mumbai – 400001 |
|---|---|
| अर्ज कालावधी | जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवस आत अर्ज पोहोचले पाहिजेत. उशिरा आलेले अर्ज नाकारले जातील. |
इतर महत्त्वाच्या सूचना
- प्रत्येक उमेदवाराने फक्त एकच अर्ज सादर करावा.
- अपूर्ण अर्ज किंवा चुकीच्या वर्गात केलेले अर्ज अवैध मानले जातील.
- विभागाला भरती रद्द/स्थगित/बदल करण्याचा अधिकार राखीव आहे.
- RTI अंतर्गत माहिती भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत दिली जाणार नाही.
परीविक्षण कालावधी
निवड झालेल्या उमेदवारांना दोन वर्षांचा परीविक्षण (Probation) असेल.
संपर्क / अधिक माहिती
Office of the Principal Commissioner of Customs (General),
New Custom House, Ballard Estate, Mumbai – 400001
Telephone: 022-22757737 / 7735
Email: p-estt-mum-cus-zone1@gov.in