🌸 लाडकी बहीण योजना म्हणजे काय?
महाराष्ट्र सरकारने राज्यातील महिलांना आर्थिक बळकटी देण्यासाठी “लाडकी बहीण योजना” सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दर महिन्याला ₹1,500 इतकी आर्थिक मदत दिली जाते
पण या लाभासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे — लाडकी बहीण योजना e-KYC पूर्ण करणे. तर आज आपण पाहणार आहोत की ekyc म्हणजे काय आणि ekyc कशी करावी तसेच ekyc झाली आहे का नाही कसे पहावे चला तर मग पाहू.
हेही वाचा 👉लाडकी बहीण योजनेत २६.३४ लाख लाभार्थ्यांना दणका लाभ तात्पुरता थांबवला!

✅लाडकी बहीण योजना e-KYC म्हणजे काय?
e-KYC (Electronic Know Your Customer) ही प्रक्रिया म्हणजे तुमची ओळख आणि पात्रता ऑनलाइन पद्धतीने पडताळणे.सरकारच्या डेटाबेसशी आधार क्रमांक लिंक करून ही पडताळणी केली जाते.यामुळे चुकीच्या किंवा बनावट अर्जांना प्रतिबंध होतो आणि लाभ योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचतो. कारण मागील काळात खूप फसवणूक झाली आहे.
हेही वाचा 👉लाडकी बहीण योजना 2025 eKyc सुरू
💻लाडकी बहीण योजना e-KYC झाली का नाही हे कसं तपासायचं?
आता तुम्ही फक्त एका क्लिकवर तुमची e-KYC पूर्ण झाली आहे का नाही हे तपासू शकता.
यासाठी खालील सोपी पद्धत वापरा 👇
🔹 Step by Step मार्गदर्शक:
1. सर्वप्रथम ladkibahin.maharashtra.gov.in/ekyc या अधिकृत संकेतस्थळावर जा.
2. तेथे eky करण्याचा ऑप्शन ओपन होईल तेथे तुम्हाला दिसेल लाभार्थी आधार क्रमांक.
3. तेथे तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकून captch टाकून
4. “Submit / Verify” बटणावर क्लिक करा.
5. काही सेकंदातच स्क्रीनवर दिसेल —
✅ “आपली e-KYC पूर्ण झाली आहे”
❌ “आपली e-KYC अजून प्रलंबित आहे”
याने तुम्हाला समजेल की तुमची e kyc पूर्ण झाली आहे का नाही व नसेल झाली तर कोणत्या स्टेज ला आहे
लाडकी बहीण योजना e-KYC करण्यासाठी
📱 मोबाईलवरून e-KYC कशी करावी?
जर तुमची e-KYC अजून झाली नसेल, तर ती मोबाईलवरूनही सहज करता येते.
1. लाडकी बहीण योजना Portal उघडा
2. “Do e-KYC” पर्यायावर क्लिक करा
3. आधार क्रमांक व OTP टाका
4. तुमची माहिती तपासा व Submit करा
इतकं झालं की e-KYC प्रक्रिया पूर्ण होते ✅
हेही वाचा 👉PM Kisan Yojana: ₹2000 रुपयाचा हप्ता खात्यात आला नाही? कारण आणि उपाय जाणून घ्या!
📢 लक्षात ठेवा:
e-KYC पूर्ण झाल्यानंतरच योजनेचा लाभ मिळेल.
चुकीची माहिती दिल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
💬 निष्कर्ष
“लाडकी बहीण योजना e-KYC झाली का नाही पहा फक्त एका क्लिकवर” ही प्रक्रिया महिलांसाठी अत्यंत सोपी आणि पारदर्शक आहे.फक्त काही सेकंदांत तुम्हाला तुमचा e-KYC स्टेटस समजेल आणि योजना लाभ घेण्यासाठी पुढचं पाऊल उचलता येईल.
हेही वाचा 👉लाडकी बहिण योजना अपात्र यादी जाहीर तुमचे नाव आहे का पहा