
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना: अर्जात चूक झालेल्या महिलांसाठी सरकारचा मोठा दिलासा – आता ऑनलाइन दुरुस्तीची शेवटची संधी
राज्यातील लाखो महिलांसाठी सुरू करण्यात आलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आर्थिकदृष्ट्या मोठा आधार देणारी योजना ठरली आहे. परंतु ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया करताना झालेल्या काही तांत्रिक चुका आणि माहिती भरताना झालेल्या दुर्लक्षामुळे अनेक पात्र महिलांचे अर्ज धोक्यात आले होते.
आता अशा महिलांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ज्या लाभार्थ्यांकडून अर्ज करताना माहिती भरताना चूक झाली होती, त्यांना अर्ज दुरुस्त करण्याची पुन्हा एक अंतिम संधी देण्यात आली आहे.
लाडकी बहीण योजना नेमकी चूक काय झाली होती?
योजनेअंतर्गत 31 डिसेंबर 2025 पर्यंत मोठ्या प्रमाणावर महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली. मात्र अर्ज भरताना खालील मुद्द्यावर मोठ्या प्रमाणात चुका झाल्या:
कुटुंबातील सदस्य सरकारी कर्मचारी आहे का?
कुटुंबातील सदस्य निवृत्त सरकारी कर्मचारी (पेन्शनधारक) आहे का?
हे पर्याय निवडताना अनेक महिलांनी
घाईत
नीट समज न घेता
किंवा तांत्रिक अडचणींमुळे
चुकीचा पर्याय निवडला.
यामुळे प्रत्यक्षात पात्र असलेल्या अनेक महिलांचे अर्ज अपात्र (Ineligible) म्हणून चिन्हांकित होण्याचा धोका निर्माण झाला.
दोन्ही पर्यायांमध्ये ‘नाही’ हा पर्याय निवडायचा आहे.”
सरकारला ही समस्या कशी लक्षात आली?
जिल्हाधिकारी स्तरावर अर्जांची पडताळणी सुरू असताना अनेक प्रकरणांमध्ये आढळले की:
प्रत्यक्षात कुटुंबात सरकारी नोकरी नसताना “होय” निवडले गेले
निवृत्तीवेतन नसतानाही पेन्शनधारक दाखवले गेले
चुकीची माहिती भरल्यामुळे प्रणालीने अर्ज आपोआप अपात्र दाखवले
ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारने प्रक्रिया सुलभ करण्यासाठी ऑनलाइन दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
आता काय दिलासा मिळाला आहे?
सरकारने स्पष्ट केले आहे की:
ज्यांच्या अर्जात कुटुंबातील सदस्यांच्या सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतनासंबंधी माहिती चुकीची भरली गेली आहे
अशा महिलांना आता ऑनलाइन पद्धतीने माहिती दुरुस्त करण्याची संधी दिली जाणार आहे
ही सुविधा देण्यासाठी पोर्टलमध्ये आवश्यक तांत्रिक बदल करण्यात आले आहेत.
e kyc करण्यासाठी येथे क्लिक करा
कोणत्या महिलांनी दुरुस्ती करणे आवश्यक आहे?
खालीलपैकी कोणतीही परिस्थिती असेल तर लगेच अर्ज तपासा:
अर्ज करताना “कुटुंबात सरकारी कर्मचारी आहे” असे चुकून निवडले
“कुटुंबातील सदस्य पेन्शन घेतो” हा पर्याय चुकीने निवडला
ई-केवायसी करताना माहिती नीट पडताळली नाही
अर्जाची स्थिती (Status) संशयास्पद दिसत आहे
जर वरीलपैकी काही लागू होत असेल तर दुरुस्ती करणे अत्यावश्यक आहे.
दुरुस्ती का महत्त्वाची आहे? लाडकी बहीण योजना
ही माहिती चुकीची राहिल्यास:
तुमचा अर्ज अपात्र ठरू शकतो
योजनेचा आर्थिक लाभ थांबू शकतो
पुढील हप्ते मिळण्यात अडचण येऊ शकते
म्हणूनच योग्य माहिती देऊन अर्ज दुरुस्त करणे म्हणजे तुमचा हक्काचा लाभ सुरक्षित ठेवणे होय.
ऑनलाइन दुरुस्ती करताना काय काळजी घ्यावी? लाडकी बहीण योजना
दुरुस्ती करताना खालील गोष्टी नक्की लक्षात ठेवा:
कुटुंबातील सदस्यांची नोकरीस्थिती नीट तपासा
सरकारी नोकरी आणि खासगी नोकरी यात फरक समजून घ्या
निवृत्तीवेतन (Government Pension) मिळते का हे खात्री करून घ्या
चुकीची माहिती देऊ नका – पुढे पडताळणी होते
जर शंका असेल तर गावातील सेवा केंद्र, CSC सेंटर किंवा अधिकृत मदत केंद्र यांची मदत घ्या.
जिल्हास्तरावर पडताळणी सुरूच राहणारलाडकी बहीण योजना
ऑनलाइन दुरुस्तीची सुविधा दिली असली तरी जिल्हाधिकारी स्तरावर प्रत्यक्ष पडताळणी सुरूच राहणार आहे. त्यामुळे जाणीवपूर्वक चुकीची माहिती दिल्यास कारवाई होऊ शकते.
सरकारचा उद्देश फसवणूक करणाऱ्यांना मदत करणे नसून,
नजरचुकीने किंवा तांत्रिक अडचणींमुळे चूक झालेल्या प्रामाणिक महिलांना न्याय देणे हा आहे लाडकी बहीण योजना.