PM Kisan : आज मिळणार पीएम किसानचा 21 वा हप्ता | PM Kisan Yojana 21st Installment अपडेट

PM Kisan Yojana 21st Installment ₹2000 Deposit Update Image

PM Kisan : शेतकऱ्यांनो आज येणार पीएम किसानचा २ हजारांचा २१ वा हप्ता; तुमचे पैसे आलेत का? तपशील जाणून घ्या

PM Kisan Yojana 21st Installment Today: देशातील लाखो शेतकरी गेल्या काही महिन्यांपासून ज्याची प्रतीक्षा करत होते, त्या पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) २१ वा हप्ता अखेर आज (१९ नोव्हेंबर २०२५) जमा होणार आहे. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने अधिकृत घोेषणा केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे.

या निर्णयामुळे शेतकरी आनंदात असले तरी काहींच्या मनात चिंताही आहे. कारण ई-केवायसी न केलेले लाभार्थी, चुकीची कागदपत्रे असलेले शेतकरी किंवा आधार लिंकिंगमध्ये त्रुटी असणाऱ्यांचे पैसे रोखले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमचा PM Kisan 21st Installment खात्यात आला आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे. त्याचबरोबर या टप्प्यात कोणती राज्ये वगळली आहेत, हेही महत्त्वाचे आहे.


आज दुपारी खात्यात जमा होणार ₹2000 चा PM Kisan 21st Installment

नवीन माहितीनुसार, PM Kisan Yojana 21st Installment आज, १९ नोव्हेंबर २०२५ रोजी पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. केंद्र सरकारने १४ नोव्हेंबर रोजी ही घोषणा केली होती. आज दुपारी २ वाजल्यापासून निधी हस्तांतरण सुरु होईल अशी शक्यता आहे.

या वेळेनंतर महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम ट्रान्सफर होऊ लागेल.


PM Kisan चे लाभार्थी असाल तर ‘हे’ काम आधी नक्की करा

पीएम किसानचा फायदा मिळवण्यासाठी e-KYC पूर्ण करणे बंधनकारक आहे.
ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केलेली नाही, त्यांचा PM Kisan Yojana 21st Installment थांबू शकतो.

तसेच खालील त्रुटी असल्यासही हप्ता अडकू शकतोः

आधार क्रमांक चुकीचा

नाव बँक खात्यातील नावाशी न जुळणे

बँक खाते तपशील चुकीचे असणे

दस्तऐवज अपूर्ण असणे

अशा शेतकऱ्यांची नावे यादीतून वगळली जाऊ शकतात.


नमो शेतकरी सन्मान निधी (Namo Shetkari Samman Nidhi) कधी जमा होणार?

PM Kisan 21st Installment वितरित झाल्यानंतर महाराष्ट्र शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील (८ वा) हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होते.

राज्य सरकार सर्व पात्र शेतकऱ्यांची यादी मागवते, त्यानंतर निधी मंजुरी व GR काढला जातो. सध्या मिळालेल्या माहितीनुसार, नमो शेतकरी योजनेचा ८ वा हप्ता डिसेंबरच्या २० तारखेपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे.

तुमचा पीएम किसानचा हप्ता आला आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट
pmkisan.gov.in येथे जाऊन स्थिती पाहू शकता.


स्मार्ट रेशन कार्ड असे करा डाउनलोड जुने रेशन कार्ड झाले बंद

https://lawinmarathi.in/smart-ration-card-download-process-mera-ration-app/https://lawinmarathi.in/smart-ration-card-download-process-mera-ration-app/

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top