लाडकी बहीण योजना: E-KYC ला मोठी मुदतवाढ, महिलांसाठी सरकारचा मोठा दिलासा (2025)

लाडकी बहीण योजना: E-KYC प्रक्रियेस मोठी मुदतवाढ, महिलांना दिलासा!

लाडकी बहीण योजना: E-KYC प्रक्रियेस मोठी मुदतवाढ, महिलांना दिलासा!

राज्य सरकारने लाडकी बहीण योजणा या महत्त्वाच्या उपक्रमातील ई-केवायसी प्रक्रियेला मोठी मुदतवाढ जाहीर केली आहे. अनेक महिलांना OTP न मिळणे, तांत्रिक अडचणी, तसेच काही भागांतील नैसर्गिक आपत्ती यामुळे ई-केवायसी पूर्ण करता येत नव्हते. त्यामुळे हजारो लाभार्थी महिलांमध्ये चिंता निर्माण झाली होती. अखेर सरकारने महिलांच्या मागणीची दखल घेत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

लाडकी बहीण योजना E-KYC ला मुदतवाढ का?

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, खालील कारणांमुळे मुदतवाढ देणे अत्यावश्यक होते:

  • अनेक जिल्ह्यांत अलीकडेच आलेल्या पुर आणि नैसर्गिक संकटांमुळे ई-केवायसीची प्रक्रिया थांबली.
  • आधार क्रमांकावर OTP न मिळाल्यामुळे हजारो महिलांचे EKYC अपूर्ण राहिले.
  • काही महिलांच्या पती किंवा वडिलांचे निधन झाल्याने OTP प्राप्त करणे अशक्य झाले.
  • घटस्फोटित महिलांना स्वतंत्र ई-केवायसी करण्यासाठी कागदपत्रांची गरज होती.

सरकारचे मत स्पष्ट आहे—लाडकी बहीण योजना अंतर्गत कोणतीही पात्र महिला तांत्रिक किंवा अपरिहार्य कारणांमुळे वंचित राहू नये.

ज्यांच्या पती/वडील हयात नाहीत – त्यांच्यासाठी विशेष मार्गदर्शन

ज्या महिलांना OTP समस्या येत आहे आणि पती/वडील हयात नाहीत, अशांनी ई-केवायसी करताना पुढील कागदपत्रांची सत्यप्रत सादर करावी:

  • मृत्यू प्रमाणपत्र
  • घटस्फोट प्रमाणपत्र
  • न्यायालयाचा आदेश (लागू असल्यास)

या कागदपत्रांच्या आधारे त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

लाडकी बहीण योजना – सरकारचा महिलांसाठी सहानुभूतीपूर्ण निर्णय

राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली लाडकी बहीण योजना E-KYC प्रक्रिया अधिक लवचिक करण्यावर भर देण्यात आला आहे. सरकारचा उद्देश एकच — “प्रत्येक पात्र महिलेपर्यंत योजनेचा लाभ पोहोचू द्या.”

OTP न मिळण्याच्या समस्येमुळे वाढलेली धाकधूक

ई-केवायसीची पूर्वीची अंतिम मुदत जवळ येत असल्याने महिलांमध्ये धास्ती निर्माण झाली होती. अनेक जणी OTP न मिळाल्याने चिंतेत होत्या. परंतु आता मुदतवाढ मिळाल्याने महिलांना पुरेसा वेळ उपलब्ध झाला आहे आणि चिंतेतून मुक्तता मिळाली आहे.

लाडकी बहीण योजना E-KYC अंतिम तारीख:

31 डिसेंबर 2025

Ayushman Card Download करा फक्त 1 मिनिटात! मोबाईलवरून मिळवा 5 लाखांचे कवच

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top