PM Kisan Yojana: ₹2000 रुपयाचा हप्ता खात्यात आला नाही? कारण आणि उपाय जाणून घ्या!

 

शेतकऱ्याच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत ₹2000 चा हप्ता जमा न झाल्याचे कारण आणि उपाय स्पष्ट करणारी माहितीपूर्ण मराठी इमेज
 
 

PM Kisan Yojana :- सन्मान निधी योजनेअंतर्गत मिळणारी 2000 रुपये चा  २० वा हप्ता  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ ऑगस्ट २०२५ रोजी वाराणसी मधून सोडलेला आहे पण   अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा न झाल्याच्या तक्रारी आहेत. या लेखात आपण याचे कारणे आणि उपाय समजून घेणार आहोत.कि कोणत्या कारणांमुळे पैसेआलेले नाहीत .

 PM Kisan Yojana बद्दल थोडक्यात 

PM Kisan Yojana ही केंद्र सरकारची योजना आहे जिच्या अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये  थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते – तीन हप्त्यांमध्ये (₹2000 प्रत्येक).

  2000 रुपये का आले नाहीत? (मुख्य कारणं)

खालील कारणांमुळे तुम्हाला २० व हप्ता आला नसेल. 
  • e-KYC पूर्ण  केली नसेल 
  • बँक खाते आधारकार्डस लिंक नसेल .
  •   ७/१२ चे land seeding पूर्ण नसेल 
  • सामाईक क्षेत्र असेल व त्यात अनेक लोकांनी अर्ज भरलेला असल्यास बंद होऊ शकतो 
  • ७/१२ व आधार कार्ड वर नाव चुकीचे असेल नाव  जुळत नसेल 
  • फार्मर आयडी काढले नसेल 
वरील या कारणांमुळे २००० रुपये आले नसतील .

PM KISAN  च्या  पोर्टला  जाऊन KNOW OUR STATUS पहा 

खालील प्रमाणे 
  1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या: https://pmkisan.gov.in
  2. “Beneficiary Status” वर क्लिक करा
  3. AADHAAR / मोबाईल नंबर / बँक अकाउंट नंबर टाका
  4. Status बघा – हप्ता आला आहे की नाही ते स्पष्ट दिसेल व हप्ता का आला नाही याचे कारण सुद्धा दिसेल 

 e-KYC नसल्यास  KYC करा खालील प्रमाणे ?

  1. pmkisan.gov.in वर जा
  2. “e-KYC” पर्याय निवडा
  3. आधार क्रमांक व OTP टाकून प्रक्रिया पूर्ण करा
  4. किवा जवळच्या CSC CENTARE ला जाऊन भेट द्या व KYC करून घ्या  

टीप: e-KYC केल्याशिवाय हप्ता मिळणार नाही.

आधार कार्डला बँक खाते  Seeding नसल्यास लिंक करून घ्या 

जर तुमचं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक (Seeding) झालं नसेल, तर पुढील व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रक्रिया सोप्या भाषेत समजावली आहे:  खालील VIDEO पाहून लिंक करा 

Marathi Corner व्हिडिओ

 व्हिडिओतील महत्त्वाचे मुद्दे:

  • बँक खातं आधारशी लिंक कसं करायचं?
  • PM Kisan, DBT योजनेसाठी आधार Seeding का आवश्यक आहे?
  • UIDAI आणि NPCI स्टेटस कसे तपासायचे?

☎️ तक्रार करण्यासाठी संपर्क

माध्यम माहिती
हेल्पलाइन 155261 / 011-24300606
वेबसाइट pmkisan.gov.in
 स्थानिक कार्यालय ग्रामसेवक / तलाठी / कृषी सहाय्यक

महत्वाची सूचना: PM-Kisan योजनेबाबत

कृषी विभागाने काही संशयित प्रकरणे ओळखली आहेत जी पीएम-किसान योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये नमूद केलेल्या वगळण्याच्या निकषांतर्गत येऊ शकतात.

 अशा प्रकरणांमध्ये समाविष्ट आहेत:

  1. 01-02-2019 नंतर जमीन मालकी मिळवलेले शेतकरी
  2. जिथे एकापेक्षा जास्त कुटुंबातील सदस्यांना लाभ मिळत आहेत (उदा. पती-पत्नी दोघेही, एक प्रौढ सदस्य आणि अल्पवयीन इ.)

👨‍🌾 पात्रता निकष (Eligibility Criteria)

PM-KISAN योजनेचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहे:

1. जमीन धारक लघु आणि सीमांत शेतकरी (Small & Marginal Farmers)

  • ज्यांच्याकडे २ हेक्टर (५ एकर) पर्यंत शेती जमीन आहे.

  • जमीन त्यांच्या नावावर असणे आवश्यक आहे (फेरफार/७/१२ वर नाव असावे). व सामाईक नसावी सामाईक असल्यास इतर खाते दारांची  समती पत्र 

2. जमीन 01/02/2019 पूर्वी मिळालेली हवी

  • जमीनधारकाची नाव नोंद १ फेब्रुवारी २०१९ पूर्वीची असावी.

  • नंतर मिळाल्यास तो शेतकरी नवीन पात्रतेनुसार तपासला जाईल.

3. वैध कागदपत्रे असणे आवश्यक

  • आधार कार्ड घरातील सर्वांची 

  • ७/१२ उतारा (मालकी दर्शवणारा दस्तऐवज)

  • बँक खाते (NPCI लिंक असलेले)

  • मोबाईल नंबर


 

Author

  • Samarth Herkal ब्लॉगवरील Content Editing आणि Quality ची जबाबदारी सांभाळतात. माहिती अचूक आणि सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचावी यासाठी सतत काम करतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top