लाडकी बहिण योजना अपात्र यादी जाहीर तुमचे नाव आहे का पहा

लाडकी बहीण योजना म्हणजे काय? तसेच अपात्र यादी

महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजना सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिना रु. १,५००/- असा आर्थिक लाभ DBT द्वारे देण्यात येतो. चला तर मग पाहून लाडकी बहीण योजना अपात्र यादी तसेच कोण कोणत्या महिला अपात्र यादी मध्ये समाविष्ट आहेत अपात्र यादी कशी पहावी सर्व काही

या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट

या योजने मुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे तसेच घरगुती खर्चाला हातभार लावणे व महिलांना स्वावलंबी बनवणे तसेच गरिबी कमी करणे हे या योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

लाडकी बहीण योजना पात्रता (Eligibility)

सदर योजने साठी महाराष्ट्र राज्यातील महिला असणे आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.२. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.३. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.४. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.५. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. २.५० लाखापेक्षा जास्त नसावे.

नमो शेतकरी योजना

लाडकी बहीण योजना अपात्रता तसेच अपात्र ठरण्याची संभाव्य कारणे

लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या महिलांची यादी जाहीर करण्याचे कारण हे असते की त्यांनी योजनेच्या पात्रता निकषांचे पालन केलेले नाही. अपात्रतेची काही सामान्य कारणे खालीलप्रमाणे असू शकतात:

  • ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रु.२.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे.
  • २. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे.
  • ३. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित / कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत. तथापि, रु. २.५० लाखा पर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.
  • ४. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा रु. १५००/- किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.
  • ५. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.
  • ६. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.
  • ७. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे. यात जी महिला बसते ती अपात्र आहे.

यादी कशी तपासावी

तुम्हाला तुमच्या नावाची यादी तपासायची असल्यास, तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता. अनेकदा, अपात्र अर्जदारांची यादी (Rejected List) किंवा अंतिम यादी (Final List) वेबसाइटवर उपलब्ध केली जाते किंवा तुम्ही तुमच्या अर्ज स्थितीची (Application Status) तपासणी करू शकता.

PM Kisan Yojana: ₹2000 रुपयाचा हप्ता खात्यात आला नाही? कारण आणि उपाय जाणून घ्या!

तुम्ही अपात्र आहात का नाही खालील स्टेप फॉलो करून पहा

अधिकृत वेबसाइट वर जा: ladakibahin.maharashtra.gov.in वर जा तुम्हाला तेथे दिसेल मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे लाभार्थी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीयेथे क्लिक करावे. या पर्यायावर क्लिक करून ekyc चे पोर्टल opean होईल त्या नंतर तुम्हाला तुमचा आधार नंबर तेथे टाकून captcha code टाकून submit बटनावर क्लिक करायचे आहे जर तुम्ही पात्र असाल तर पुढची स्टेप ओपन होईल जर तुम्ही अपात्र असाल तर तुम्हाला सदर आधार क्रमांक योजनेच्या पात्र यादीत समाविष्ट नाही असा message दिसेल किंवा तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात असा मेसेज येईल म्हणजेच तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये अपात्र आहात तुमचे नाव अपात्र यादीत आहे

टीप: ही योजना मध्य प्रदेशातील ‘लाडली बहना योजना’ (Ladli Behna Yojana) पासून वेगळी आहे, पण महाराष्ट्रातील ‘लाडकी बहीण योजना’ या नावानेही ओळखली जाते. अधिकृत आणि अचूक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या अधिकृत सूचना तपासाव्यात.

लाडकी बहीण योजनेत २६.३४ लाख लाभार्थ्यांना दणका लाभ तात्पुरता थांबवला!

ई-पीक पाहणी 2025: नोंदणी, ॲप, अंतिम तारीख आणि सर्वोत्तम फायदे

Author

  • Samarth Herkal ब्लॉगवरील Content Editing आणि Quality ची जबाबदारी सांभाळतात. माहिती अचूक आणि सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचावी यासाठी सतत काम करतात.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top