October 01, 2025
महाराष्ट्र शासनाने सुरु केलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना’ या योजनेचा लाभ सर्व पात्र महिलांना वेळेत मिळावा यासाठी सरकारने e-KYC (इलेक्ट्रॉनिक पडताळणी) प्रक्रिया अनिवार्य केली आहे. लाभार्थींनी तात्काळ ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. तर आज आपण पाहणार आहोत KYC कशी करायची चला तर मग पाहू
Table of Contents

लाडकी बहिण योजना e-KYC म्हणजे काय?
eKYC म्हणजे लाभार्थीची आधारकार्डद्वारे ऑनलाइन पडताळणी. यामुळे लाभ योग्य महिलांपर्यंत पोहोचत आहे का आणि फसवणूक टाळली जाते. शासनाने यासाठी खास ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून दिले आहे.जेणे करून योग्य महिलेला लाभ मिळत आहे का हे तपासण्यासाठी .
🔗 👉 e-KYC करण्यासाठी येथे क्लिक करा
e-KYC प्रक्रिया कशी करावी?
- सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलला भेट द्या. वरील दिलेल्या लिंक वर क्लिक करा
- मुख्य पृष्ठावर दिसणाऱ्या “eKYC” पर्यायावर क्लिक करा.
- तुमचा आधार क्रमांक व कॅप्चा कोड प्रविष्ट करा.
- Send OTP बटण दाबा.
- आधारशी लिंक असलेल्या मोबाईलवर आलेला OTP टाका.
- Submit वर क्लिक करून पडताळणी पूर्ण करा.
- त्या नंतर वडील / किवा पतीचा आधार नंबर टाका व पुन्हा कॅप्चा कोड प्रविष्ट करा.Submit वर क्लिक करून पडताळणी पूर्ण करा.
- स्क्रीनवर यशस्वी संदेश दिसल्यास तुमची eKYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
- eKYC पूर्ण झाली आहे का नाही याची खात्री करण्यसाठी पुन्हा आधार नंबर टाका व त्या नंतर पहा काय मेसेज येत आहे पहा eKYC आधीच झालेली आहे असा message दिसत असल्यास तुमची KYC झालेली आहे
PM Kisan Yojana: ₹2000 रुपयाचा हप्ता खात्यात आला नाही? कारण आणि उपाय जाणून घ्या!
तपासणी आणि घोषणापत्र
प्रणाली तुमचा आधार क्रमांक लाभार्थी यादीत आहे की नाही हे तपासेल.
जर eKYC आधीच पूर्ण असेल, तर संदेश दिसेल – “तुमची KYC प्रक्रिया आधीच पूर्ण झाली आहे”.
जर आधार क्रमांक जुळत नसेल, तर तुम्ही पात्र नाही अशी सूचना येईल.
काही प्रकरणांमध्ये पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक भरावा लागू शकतो.
घोषणापत्रात हे स्पष्ट करावे लागेल :
कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत नाहीत
निवृत्तीवेतन घेत नाहीत
फक्त पात्र महिला लाभ घेणार आहे
लक्षात ठेवण्यासारख्या बाबी
✅ eKYC प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
✅ आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर जवळ ठेवा.
✅ चुकीची माहिती दिल्यास लाभ नाकारला जाऊ शकतो.
✅ यशस्वी KYC झाल्यानंतरच आर्थिक सहाय्य खात्यावर जमा होईल.
निष्कर्ष
ई-पीक पाहणी 2025: नोंदणी, ॲप, अंतिम तारीख आणि सर्वोत्तम फायदे
❓ लाडकी बहिण योजना eKYC संबंधित वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
1. लाडकी बहिण योजना eKYC म्हणजे काय?
👉 eKYC म्हणजे आधारकार्डाद्वारे ऑनलाइन पडताळणी प्रक्रिया. यामुळे पात्र महिलांची ओळख निश्चित होते आणि लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचतो.
2. eKYC प्रक्रिया कुठे करायची?
👉 महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टलवर “eKYC” पर्यायावर क्लिक करून प्रक्रिया करता येते.
3. eKYC करण्यासाठी कोणते कागदपत्र लागतात?
👉 फक्त आधार क्रमांक आणि आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर आवश्यक आहे.
4. eKYC करताना OTP आला नाही तर काय करावे?
👉 तुमचा मोबाईल नेटवर्क तपासा. तरीही OTP न आल्यास आधारशी मोबाईल नंबर लिंक आहे का ते तपासा किंवा आधार केंद्रात जाऊन मोबाईल अपडेट करा.
5. eKYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे की नाही हे कसे कळेल?
👉 यशस्वी झाल्यास स्क्रीनवर संदेश दिसेल – “तुमची eKYC प्रक्रिया पूर्ण झाली आहे.”
6. जर आधार क्रमांक जुळला नाही तर काय होईल?
👉 अशा परिस्थितीत तुम्हाला “तुम्ही पात्र नाही” अशी सूचना दिसेल आणि लाभ मिळणार नाही.
7. eKYC करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
👉 शासनाने जाहीर केलेल्या अंतिम तारखेपूर्वी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. (तुम्ही नियमितपणे अधिकृत पोर्टल तपासा).
8. eKYC न केल्यास काय होईल?
👉 जर eKYC केली नाही तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळणार नाही आणि आर्थिक सहाय्य खात्यावर जमा होणार नाही.
eKYC कशी करायची खालील video पहा
Sangita Devkar, Legal Blogger & Government Schemes Expert
helping women access benefits via schemes and e-KYC processes.